Sanjay Raut | एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “नैतिकतेच्या आधारावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. कारण त्यांचं सरकार बेकायदेशीरपणे उभारलं गेलं आहे. सरकार टिकलं म्हणून आता शिंदे गटाने पेढे वाटतं बसू नये. सरकारला त्यांची पापडं झाकायची असेल, तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.”

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही सरकार प्रस्थापित करू शकलो असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आहे. त्यामुळे कुणीही ऐरागैरा शिवसेना आपली आहे असं म्हणू शकतं नाही, असं देखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाले असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देत भरत गोगावले म्हणाले, “माझी नियुक्ती बेकायदेशीर हे मत आहे निकाल नाही.”

महत्वाच्या बातम्या