Sharad Pawar | देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करणार शरद पवार; नितीश कुमार म्हणतात…

Sharad Pawar | मुंबई: जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. देशातील विरोधकांनी एकत्र राहिलं पाहिजे, असं मत त्यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितीश कुमार म्हणाले, “भाजप देशहिताच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी विरोधकांचा चेहरा व्हाव. ते विरोधकांचा चेहरा झाले तर आनंदच आहे. देशामध्ये महाआघाडी करण्याचा आम्ही विचार करत आहोत. भविष्यामध्ये विरोधक एकत्र आले तर शरद पवार त्याचं नेतृत्व करतील.”

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, “आजच्या घडीला विरोधकांनी एकत्र राहणं खूप महत्त्वाचं आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. कारण भाजप सत्तेचा गैरवापर करताना दिसत आहे.”

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला आहे. सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती, असं मत त्यांनी स्पष्टपणे मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या