Ajit Pawar | बाबारे- काकारे-मामारे करत बसतात; अजित पवारांनी सुषमा अंधारेंना खडसावलं

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निर्णय दिला. 16 अपात्र आमदारांचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. याबाबत अजित पवार यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. याबद्दल बोलत असताना अजित पवारांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना खडसावलं आहे.

सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक झाल्या होत्या. विरोधी पक्षाने सुषमा अंधारेंवर टीका केली होती तेव्हा विरोधी पक्षाने त्याची दखल घेतली नव्हती असे म्हणतं अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, “सुषमा अंधारे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आहेत. पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा, त्या ज्या पक्षाचं काम बघतात ज्या पक्षासाठी बाबारे- काकारे-मामारे करतात आणि आणि सभा घेत आहेत. त्यांच्यासमोर भावनिक व्हावं.”

“पवारांसमोर रडण्यापेक्षा तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांसमोर रडणं योग्य ठरलं असतं. तो मुद्दा अंबादास दानवे यांना उचलून धरता आला असता”, अशा शब्दात अजित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुषमा अंधारे आणि शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी अंधारे यांनी पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र वाचून दाखवलं. हे पत्र वाचताना त्यांना अश्रू आवरता आले नाही. रडतच त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.