Czech Republic Firing | विद्यापीठात बेछूट गोळीबारात १५ जणांचा मृत्यू, ३० जण जखमी

Czech Republic Firing

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Czech Republic Firing | 24 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर त्याच्या विद्यापीठातील  14 जणांना ठार केले आणि 25 जणांना जखमी केले, असे पोलिसांनी सांगितले. हि घटना चेक प्रजासत्ताक  येथे घडली आहे.

विद्यार्थ्याला पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते परंतु त्याने तसे न करता पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, विद्यापीठात हल्ल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. गोळीबाराच्या घटनेदरम्यान काही विद्यार्थांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतलं. तर काही विद्यार्थी इमारतीच्या गॅलरीमध्ये लपले होते.

चेकचे गृहमंत्री विट रकुसन म्हणाले की, ”विद्यार्थ्याचा कोणत्याही अतिरेकी विचारसरणीशी किंवा गटांशी संबंध असल्याचा संशय नाही. देशात बंदूक हिंसा दुर्मिळ आहे, देशाच्या इतिहासातील हि सर्वात प्राणघातक घटना आहे. हा एक भयंकर गुन्हा आहे, जो चेक प्रजासत्ताकाने कधीही अनुभवला नाही.” असे चेकचे गृहमंत्री विट रकुसन म्हणाले.

पोलीस प्रमुख मार्टिन वोन्ड्रासेक म्हणाले की, विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांची हत्या त्याच्या मूळ गावी आदल्या दिवशी केली होती. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याची योजना आखली होती.

पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. आसपासच्या लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जान पलाच स्क्वेअरमधील व्लाटावा नदीजवळ असलेल्या इमारतीवर झालेल्या गोळीबारीच्या हेतूबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही.

पॅलाच स्क्वेअरवरील कॉन्सर्ट हॉल रुडॉल्फिनम गॅलरीचे संचालक पेटर नेडोमा यांनी चेक टीव्हीला सांगितले की त्यांनी शूटरला पाहिले आहे. गॅलरीत एक तरुण दिसला, त्याच्या हातात स्वयंचलित शस्त्र होते. तो गोळीबार करत होता.

महत्वाच्या बातम्या