Corona JN.1 । कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईत मास्क सक्ती? वाचा पूर्ण माहिती

COVID update: Centre issues advisory to states as JN.1 sub-variant detected in India

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Corona JN.1 । देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा जे-१ या नव्या व्हेरिएंटचा रूग्ण कोकणात आढळल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी मास्कची सक्ती मात्र केलेली नाही.

कोरोनावर आज दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही बैठक बोलावली आहे. सगळे जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाढत्या रुग्णांमुळे सरकार अलर्ट मोडवर आहे.

सांगलीत दोन रुग्ण आढळले

सांगली शहरातील वयोवृद्ध पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील वयोवृद्ध पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.

संभाजीनगरात दोन रुग्ण आढळले

छत्रपती संभाजी नगर शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. ६६ नमुन्यांपैकी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. संभाजीनगर शहरात दोन कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.

तसेच राज्यात आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करावी. त्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स याबाबत माहिती घ्यावी.

सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी मास्क वापरणे अनिवार्य

दरम्यान, केंद्र सरकारने राज्याला कठोर निर्देश देत प्रत्येक जिल्ह्यात कसून चाचणीच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांना कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यांना व्हायरसचे नवीन प्रकार ओळखण्यासाठी भारतीय SARS COV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) प्रयोगशाळांना नमुने पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेजारील कर्नाटक राज्य सरकारने 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या