COVID – 19 | ऐन दिवाळीत कोरोनाचं संकट; सहा महिन्यानंतर आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

COVID – 19 | टीम महाराष्ट्र देशा: साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले होते. यादरम्यान कोरोनाच्या जगभरात तीन लाटा येऊन गेल्या होत्या.

या गंभीर आजारामुळे अनेकांना आपल्या नातेवाईकांना गमवावे लागले होते. तर या रोगामुळे सर्वांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला होता. अशात कोरोना संपला असं वाटत असताना सहा महिन्यानंतर राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.

A four-year-old child has contracted corona

राज्यात सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. अशात तब्बल सहा महिन्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चार वर्षीय चिमुकलीला कोरोना झाला आहे.

या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये ही चार वर्षीय मुलगी राहते.

तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दिलासादायक बातमी म्हणजे त्या मुलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. याच पार्श्वभूमीवर कोरोना संपला असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मात्र, शनिवारी (4 नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात एका चार वर्षीय चिमुकलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या माहितीनंतर परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तब्बल वर्षभरानंतर शहरात कोरोना रुग्ण आढळल्यामुळे मनपा आरोग्य यंत्रणा देखील हादरून गेली आहे. ऐन दिवाळीत कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून तातडीने पावलं उचलले जात आहे.

त्याचबरोबर कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडा. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. सर्दी खोकला ताप इत्यादी लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe