Share

देवेंद्र फडणविसांनी पंकजा मुंडेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला? मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे मोठे आव्हान

Beed Loksabha Election 2024 Pankaja Munde Vs Devendra Fadnavis Jyoti Mete । पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला असल्याचीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात.

Published On: 

🕒 1 min read

Pankaja Munde Vs Jyoti Mete । बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली असून, शरद पवार गटाकडून (Sharad Pawar ) विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी असा निर्णय होण्याची शक्यता आहेत.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंडे लोकसभेच्या प्रचाराला लागल्या आहेत. तर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर व्हावी नंतरच पक्ष प्रवेश करेल, अशी अट शरद पवारांना घातल्याची सूत्रांची माहिती आहे.

बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे, यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील एक गट आग्रही आहे. पण निवडणूका फक्त पैशाच्या जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाही याचा दांडगा अनुभव शरद पवारांना आहे.

तसेच बीड येथील जागा भाजपकडे आहे, महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याने सोनवणे यांना निवडणूक लढवता आली नसती म्हणून राजकीय वेळ साधत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट आहे. २०१९ ला भाजपाकडे जाऊन आलेले अजित पवारांचे उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी पुनर्वसन केले, त्या चुकीने आज पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शरद पवार वेळ साधत आलेल्या बजरंग सोनवणे यांच्यावर किती विश्वास ठेवतील तो येणारा काळ ठरवेल.

दुसरीकडे पंकजा मुंडेंना ‘काटे कि टक्कर’ देतील अश्या मराठा आरक्षण प्रणेते, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आहेत. जातीचे समीकरणे महत्त्वाचे ठरणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार मिळाला तर मुंडेंना निवडणूक अवघड जाणार असून मराठा महिला उमेदवाराचे आव्हान पंकजा कशा पेलणार? अशी चर्चा आता ऐकायला मिळत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलने गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहेत. मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आढावा घेत शरद पवारांकडून ज्योती मेटे यांनाच लोकसभा उमेदवारी देऊन पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले असून ते आता महायुतीचे भाग आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. परंतु चर्चा अशी आहे की, धनंजय मुंडे यांनी आपला राजकीय शत्रू संपवला आहे. परळीत विधानसभेला त्यांना आता पंकजा मुंडे यांच्यासारखे मोठे आव्हान नसणार आहे.

पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला असल्याचीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात. त्यांना यावेळी डावलणे भाजपला जड गेले असते. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा यांना मदत करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे फडणवीसांची गोची होणार होती, यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे लोकसभेची उमेदवारी देत ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते.

शिवाय, मनोज जरांगे हे मराठा उमेदवार आणि मराठा आरक्षण प्रणेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना मदत करतील असे चित्र बीड लोकसभा मतदार संघात आहे.

Beed Loksabha Election 2024 Pankaja Munde Vs Jyoti Mete

मराठा समाज मुंडे परिवारावर नाराज आहे कारण,  प्रीतम मुंडे यांचे मराठा समाजावरील वक्तव्य. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतांना विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत बोलताना म्हणाल्या की, प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही, असं म्हंटल्याने मराठा समाज दुखावला गेला. मुंडे फक्त ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका घेतात मराठा आरक्षणावर बोलत नाही असा संदेश मराठा समाजामध्ये गेला होता.

एका व्हायरल व्हिडिओ मध्ये प्रीतम मुंडे म्हणतात की, समोर ३ गरजू असतील तर आपल्या जातीचा पाहून त्याला मदत करा. विद्यमान खासदार बीड मध्ये जातीचे राजकारण करतात आणि मराठा समाजाला डावलतात अशी चर्चा या व्हायरल व्हिडिओ नंतर सुरु झाली.

याच मुख्य कारणाने प्रीतम यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे यांना संधी मिळाली आहे. इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

हत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही