Ajit Pawar | उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Beed) आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी युवा संवाद मेळाव्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Ajit Pawar On Beed
बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. इथे या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. “बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचे देवदेवतांना साकडे आहे. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत”, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केलं.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे असंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हंटल आहे. पुढे ते म्हणाले, “एक लक्षात ठेवा जिथे जिथे शेतकऱ्यांना मदत लागेल तिथे आम्ही महायुतीचं सरकार म्हणून तुमच्या पाठिशी आहोत. पण तुम्हालाही सांगणं आहे की तरुणांनो या कानाचं ऐकून त्या कानी सांगत बसू नका. तरुणांनी आपली संघटना मजबूत करण्यासाठी काम केलं पाहिजे. अशातूनच नेतृत्व तयार होत असतं.”
बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. यावर अजित पवार यांनी जाती-जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा असल्याचं म्हंटल आहे. प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डीजिटलचा वापर करा. पण चांगल्या कामासाठी करा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :