🕒 1 min read
टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांची अवस्था फक्त मार खाण्यापुरतीच मर्यादित उरली आहे का? एका सामन्यानंतर गोलंदाजाचे करिअर धोक्यात येणाऱ्या या युगात, क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आता थेट मैदानात उतरून एक मोठा मास्टरप्लॅन मांडला आहे.
सध्याचे क्रिकेट पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट दिसत असून हा असमतोल दूर करण्यासाठी सचिनने थेट आयपीएल (IPL Rules) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ मोठे नियम बदलण्याचा जाहीर सल्ला दिला आहे. त्याच्या या सूचनेमुळे आता क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Sachin Tendulkar Suggests IPL Rules
सचिनने सर्वात पहिला हल्लाबोल केलाय तो सध्याच्या अत्यंत वादग्रस्त ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर. त्याच्या मते, या नियमामुळे संघ ८ किंवा ९ क्रमांकापर्यंत फलंदाजांची फौज उभी करत आहेत, ज्यामुळे ऑलराउंडर खेळाडूंचे महत्त्व पार संपून गेले आहे. त्यामुळे हा नियम काढून थेट ११ खेळाडूंचाच पारंपरिक सामना खेळवला जावा.
दुसरीकडे, गोलंदाजांना ताकद देण्यासाठी त्याने प्रत्येक गोलंदाजाला चारऐवजी चक्क ५ ओव्हर्स टाकण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. यामुळे मुख्य गोलंदाज अधिक प्रभाव पाडू शकतील आणि धावांच्या गतीला सहज ब्रेक लावता येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
तिसरा सर्वात मोठा बदल सचिनने ६ ओव्हर्सच्या पॉवरप्लेबाबत सुचवला आहे. यात ४ ओव्हर्सचा पॉवरप्ले फलंदाजांसाठी, तर २ ओव्हर्सचा पॉवरप्ले गोलंदाजांसाठी असावा, असे त्याचे म्हणणे आहे.
गोलंदाजांच्या या २ ओव्हर्समध्ये सीमारेषेवर ३ खेळाडू ठेवण्याची मुभा असावी आणि कर्णधाराला या ओव्हर्स सामन्यात कधीही वापरता याव्यात, जेणेकरून रणनीती आखणे सोपे होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्पॅक्ट प्लेयरचा नियम आगामी आयपीएल हंगामातून पूर्णपणे बाद होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात आहे. अशातच आता सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजाने थेट तीन मुद्द्यांवर बोट ठेवल्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धावांचा पाऊस पाडणाऱ्या या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना खरोखरच अच्छे दिन येणार का आणि सचिनच्या या सल्ल्याची अंमलबजावणी कधी होणार, यावरून आता क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना मोठे उधाण आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहिणी खडसे कडाडल्या, लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला बाद होताच थेट सरकारवर हल्लाबोल!
- आरसीबी आणि गुजरात फायनलसाठी आमनेसामने, पण पाऊस पडला तर चषक कोणाचा?
- सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशा कृष्णनसोबत घरी पोहोचले CM थलपती विजय; VIDEO व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












