Share

सुपरस्टारच्या आईचं निधन, सांत्वनासाठी त्रिशा कृष्णनसोबत घरी पोहोचले CM थलपती विजय; VIDEO व्हायरल

अजित कुमार यांच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी मुख्यमंत्री थलपती विजय पोहोचले, मात्र त्यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशाला पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Published On: 

Thalapathy Vijay Trisha spotted at Ajith Kumar mother condolence meet in Chennai

एका सुपरस्टारच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, दुसऱ्या सुपरस्टारची तिथे उपस्थिती वेगळ्याच चर्चेचा विषय बनू शकते का? होय, तमिळ सिनेसृष्टीतील ‘थला’ म्हणजेच अभिनेते अजित कुमार (Ajith Kumar) यांच्या घरी नेमकं असंच काहीसं घडलं आहे.

अजित यांच्या आई मोहिनी मणी यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी चेन्नईत वृद्धापकाळाने निधन झालं. ही दुःखद वार्ता मिळताच अजित कुमार यांनी आपला दुबई दौरा अर्धवट सोडला आणि ते तातडीने चेन्नईला परतले.

Thalapathy Vijay And Trisha 

चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी अजित यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. यात सर्वात महत्त्वाची उपस्थिती होती ती तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांची.

कडेकोट सुरक्षेत विजय यांच्या गाडीचा ताफा तिथे पोहोचला. गाडीतून उतरताच विजय यांनी थेट अजित यांना जवळ घेत त्यांची गळाभेट घेतली. या भावनिक क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पण, या संपूर्ण प्रसंगात नेटकऱ्यांच्या नजरा मात्र एका वेगळ्याच गोष्टीवर खिळल्या. विजय यांच्या अगदी बाजूला अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) उभी होती. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलेल्या त्रिशानेही अजित यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि त्रिशा हे दोन्ही स्टार्स एकाच गाडीतून तिथे पोहोचले की वेगवेगळे, याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

एका नेटकऱ्याने थेट लिहिलंय, “सगळं काही ठीक होतं, पण बाजूला त्रिशाला पाहून खऱ्या अर्थाने आश्चर्य वाटलं.” गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिशा यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

अगदी अलीकडेच थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता पुन्हा या दोघांना एकत्र पाहून चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीकडे, अजित कुमार यांच्यासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता आईच्या जाण्याने पोरक्या झालेल्या अजित यांना सावरण्यासाठी संपूर्ण सिनेसृष्टी त्यांच्या पाठीशी उभी आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install