Bacchu Kadu | अमरावती: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह 09 मंत्र्यांचा त्या दिवशी शपथविधी झाला. या घटनेनंतर शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
Some MLAs left the Shivsena criticizing the NCP – Bacchu Kadu
बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत शिवसेनेतून काही आमदार बाहेर पडले. त्यानंतर आता आम्हाला कसलीही कल्पना न देता राष्ट्रवादी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाली. या घटनेचा परिणाम शिंदे गटातील आमदारांवर होणार आहे. पहिल्याला मारायचं आणि दुसऱ्याला हाती घ्यायचं, दुसऱ्याला मारून तिसऱ्याला हाती घ्यायचं. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजपसोबत जाऊन चुक झाली, असं म्हणण्यात आता काही फायदा नाही. आम्हाला आता ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे. वेळ येईल तेव्हा आम्ही ही चूक दुरुस्त करू. राष्ट्रवादी सामील झाल्यानं आपला पक्ष मोठा होईल, असं काहींना (भाजप) वाटत असेल. मात्र, यामुळे ते पण गोत्यात सापडणार आहे.”
“आपली सत्ता आणि आपला पक्ष वाढवताना दुसऱ्याचं मरण होऊ नये, याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी. हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. एखाद्यानं किती वेळ थांबायचं? किती सहन करायचं? जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाचं राहणार नाही”, असही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे BJP आमदारांमध्ये नाराजी – संजय शिरसाट
- Nitesh Rane | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं शक्य नाही – नितेश राणे
- Uday Samant | ठाकरे गटात कुणीच परत जाणार नाही – उदय सामंत
- Devendra Fadnavis | सिंचन घोटाळ्यातील बैलगाडी भर पुराव्यांचं करायचं काय? नेटकऱ्यांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल
- Sanjay Raut | महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार हे नक्की – संजय राऊत