Devendra Fadnavis | सिंचन घोटाळ्यातील बैलगाडी भर पुराव्यांचं करायचं काय? नेटकऱ्यांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सिंचन घोटाळा प्रकरणावरून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. सिंचन घोटाळ्याबाबत आमच्याकडे बैलगाडी भर पुरावे आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मोर्चा काढला होता. सध्या त्यांच्या या मोर्चाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

2 जुलै रोजी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून नेटकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला आहे. सिंचन घोटाळ्यातील बैलगाडी भर पुराव्यांचं देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे काय करतील? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis and Vinod Tawde protested against the irrigation scam

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विनोद तावडे यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात सिंचन घोटाळ्यावरून मोर्चा काढला होता. त्यांच्या या मोर्चाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अजित पवार सत्तेत (Devendra Fadnavis) सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटात वाद होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे गटाची नाराजी वाढत असल्यामुळे एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.