Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. सरकारमध्ये येताचं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, या चर्चांना भारतीय जनता पक्षानं पूर्णविराम दिला आहे. 2024 पर्यंत मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेचं (Eknath Shinde) राहतील असं भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे.
Is the Shinde group upset?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात होतं. ज्याला एक भाकरी खायची होती त्याला ती अर्धीच मिळत होती. मात्र, आता त्याला पावभर भाकरीवरच समाधान मानावं लागणार असल्याचं भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. सरकारमध्ये सगळं सुरळीत सुरू असताना अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपस्थित केला होता. या सर्व गोष्टींमुळे एकनाथ शिंदेंची कोंडी झाल्याचं तर दिसून आलं होतं.
दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला होता. या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटात वाद होत होता. शिंदे गटाची नाराजी वाढत असल्यामुळे एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, भाजपनं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पहाटेच्या शपथविधीनंतर जे झालं ते पुन्हा होऊ नये, म्हणून भाजप विचारपूर्वक पावलं टाकत आहे. भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढली आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर तातडीनं राजीनामा दिला तर भाजप-शिंदे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत आलेले आमदार शरद पवारांसोबत जाऊ शकतात. 2019 मध्ये अजित पवरांसोबत आलेले नेते शरद पवारांकडे परत गेले होते. हे पुन्हा घडू नये, म्हणून भाजपनं एकनाथ शिंदेंना 2024 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील, असं आश्वासन दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | सरकारमधून शिंदे गट बाहेर पडणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं
- Eknath Shinde | …म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नागपूरहून मुंबईला आले
- Nilesh Rane | जास्त हसून बोलणारी लोकं नेहमी खोटारडी असतात; निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका
- Eknath Shinde | CM शिंदे राजीनामा देणार? उदय सामंत म्हणतात…
- Supriya Sule | भाऊ-बहिण आमने-सामने! अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…