Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी फुटल्यानंतर काल पहिल्यांदा शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट आमने-सामने आले होते. काल मुंबईमध्ये दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी मिश्किल पद्धतीनं अजित पवार गटावर टीका केली. यावरून निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना धारेवर धरलं आहे.
People who smile and talk a lot are always liars – Nilesh Rane
कालच्या भाषणामध्ये सुप्रिया सुळे यांनी हसत अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं. त्यावरून निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं आहे. हसून बोलणारी लोक नेहमी खोटारडी असतात, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही. जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे.”
खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही.
जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 6, 2023
दरम्यान, काल झालेल्या बैठकांमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार आमने-सामने आले होते. अजित पवार यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं. आमच्यावर किती पण टीका करा, पण बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | CM शिंदे राजीनामा देणार? उदय सामंत म्हणतात…
- Supriya Sule | भाऊ-बहिण आमने-सामने! अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
- Ajit Pawar | मला नेहमी जनतेसमोर विलन ठरवलं जातं – अजित पवार
- Ajit Pawar | आम्ही कुणाच्या पोटी जन्माला नाही आलो, ही चूक आहे आमची – अजित पवार
- Praful Patel | शरद पवारांनी आमच्या भावना समजून आम्हाला आशीर्वाद द्यावा – प्रफुल्ल पटेल