Ajit Pawar | आम्ही कुणाच्या पोटी जन्माला नाही आलो, ही चूक आहे आमची – अजित पवार

Ajit Pawar | मुंबई: आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा (Sharad Pawar) जास्त संख्याबळ असल्याचं या बैठकीत दिसून आलं आहे. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी शरद … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा (Sharad Pawar) जास्त संख्याबळ असल्याचं या बैठकीत दिसून आलं आहे. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मी शरद पवार यांच्या छत्रछायेखाली घडलो आहे. मी कुठे चुकलो तर शरद पवार यांनी मला ते हक्कानं सांगावं. मी ती चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाईल. मात्र हे कुणासाठी आणि कशासाठी चाललं आहे. का राज्यात असं  चित्र निर्माण केलं जातं? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का?”

Are you (Sharad Pawar) going to stop or not? – Ajit Pawar

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “तुमचं (शरद पवार) वय आता 83 झालं आहे. तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. तुम्हाला दीर्घायुष्य लाभाव, असं आम्हाला नेहमी वाटतं. सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही तयार झालो होतो. पुन्हा दोन दिवसानंतर काय घडलं काय माहित? त्यांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला.

“शरद पवारांना राजीनामा मागे घ्यायचा होता तर त्यांनी राजीनामा का दिला? ते देखील मला कळलं नाही. आमच्यात राजकारण चालवायची धमक असूनही आम्हाला आशीर्वाद का दिला जात नाही?”, असा सवाल देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही