Share

Dhananjay Munde | अजित पवार नेहमी टीकेचे धनी होतात – धनंजय मुंडे

Dhananjay Munde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार नेहमी टीकेचे धनी झाले असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “गेली अनेक वर्ष आम्ही शरद पवार साहेबांची सेवा केली आहे. शरद पवार साहेब विठ्ठल आणि आम्ही वारकऱ्यांसारखे राहिलो आहोत. अजित पवार कायम साहेबांसोबत उभे राहिले आहे. अजित पवारांवर आतापर्यंत बरीच टीका झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी खूप अपमान सहन केला आहे. अजितदादा नेहमी टीकेचे धनी झाले आहे. मात्र, त्यांनी त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. त्यांनी शरद पवार साहेबांसाठी हे सगळं सहन केलं आहे.”

Ajit Pawar was defamed in everything – Dhananjay Munde

पुढे बोलताना ते (Dhananjay Munde) म्हणाले, “आज माझ्यासारख्या ऊसतोड मजुराच्या पोराला तुमच्यासमोर बोलण्याची ताकद अजित दादांनी दिली आहे. अजित पवारांना प्रत्येक गोष्टीत बदनाम केलं गेलं. म्हणून त्यांनी हा स्वाभिमानाचा मार्ग निवडला आहे.”

“आज माझ्या डोळ्यातील अश्रू दिसत नाही. कारण माझं मन आज रडत आहे”, असही ते (Dhananjay Munde) यावेळी म्हणाले आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Dhananjay Munde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now