Ajit Pawar | अजित पवारांच्या बैठकीत शरद पवारांच्या नावाची रिकामी खुर्ची? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहेत. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक होत आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात अजित पवार यांच्या बैठकीमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. A meeting of Ajit Pawar group is going on at MET College in … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहेत. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक होत आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात अजित पवार यांच्या बैठकीमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.

A meeting of Ajit Pawar group is going on at MET College in Bandra

वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. या बैठकीला असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत. अजित पवारांच्या या बैठकीतील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बैठक सुरू (Ajit Pawar) असताना व्यासपीठावर एक रिकामी खुर्ची दिसली आहे. ही रिकामी खुर्ची शरद पवारांसाठी (Sharad Pawar) ठेवण्यात आली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीतील या रिकाम्या खुर्चीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या रिकाम्या खुर्चीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहेत. मात्र, अजित पवार गटाकडून या रिकाम्या खुर्चीबाबत कोणी प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या बैठकीमध्ये बोलत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं वक्तव्य (Ajit Pawar) केलं आहे. ते म्हणाले, “शरद पवार आमचे विठ्ठल आहे. मात्र, आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. शरद पवारांनी त्या भडव्यांना बाजूला करून आम्हाला भेटायला यावं, अशी मी त्यांना विनंती करतो.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही