Praful Patel | मुंबई: आज अजित पवार (Ajit Pawar) गटाची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी आमच्या भावना समजून आम्हाला आशीर्वाद द्यावा, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहे.
I have worked as Sharad Pawar’s shadow – Praful Patel
प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले, “मी शरद पवारांची सावली म्हणून काम केलं आहे. मी एक कमी बोलणारा व्यक्ती आहे. मात्र, भविष्यामध्ये मी एक पुस्तक लिहिणार आहे. तेव्हा राज्यातील जनतेला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहे. अजित पवारांना काही लोक बदनाम करत आहे.”
पुढे बोलताना ते (Praful Patel) म्हणाले, “अजित पवारांवर होणारे आरोप चुकीचे आहे. मी आज शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत का? असा प्रश्न अख्या देशाला पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार नाही. मात्र, योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला सविस्तर याबाबत माहिती सांगेल.
“भविष्यामध्ये अजित पवार जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रफुल्ल पटेल असतील. मी अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”, असही ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलत असताना प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी अजित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde | अजित पवार नेहमी टीकेचे धनी होतात – धनंजय मुंडे
- Ajit Pawar | अजित पवारांच्या बैठकीत शरद पवारांच्या नावाची रिकामी खुर्ची? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Chhagan Bhujbal | शरद पवार आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेतलंय – छगन भुजबळ
- Chhagan Bhujbal | “शरद पवारांनी मला बोलावलं तर…”; छगन भुजबळांचं खळबळजनक वक्तव्य
- Rupali Patil Thombare | अजितदादा विलन वाटत असले, तरी येणाऱ्या काळात तेच हिरो – रूपाली पाटील ठोंबरे