Eknath Shinde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. सरकारमध्ये सामील होताचं त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या प्रकरणावरून शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणावर उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार नाही. कुणीही दिवास्वप्न बघू नका. काहीतरी विचार करून तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
Maharashtra has accepted the leadership of Eknath Shinde – Uday Samant
पुढे बोलताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे की पुढची आमदारकीची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.”
दरम्यान, अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. या सर्व घटनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिंदे गटाची नाराजी वाढत चालल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | भाऊ-बहिण आमने-सामने! अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
- Ajit Pawar | मला नेहमी जनतेसमोर विलन ठरवलं जातं – अजित पवार
- Ajit Pawar | आम्ही कुणाच्या पोटी जन्माला नाही आलो, ही चूक आहे आमची – अजित पवार
- Praful Patel | शरद पवारांनी आमच्या भावना समजून आम्हाला आशीर्वाद द्यावा – प्रफुल्ल पटेल
- Dhananjay Munde | अजित पवार नेहमी टीकेचे धनी होतात – धनंजय मुंडे