Ajit Pawar | मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार गटाची आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली आहे. शरद पवारांना जर राजीनामा मागेच घ्यायचा होता तर त्यांनी तो दिलाच का? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
Even today I consider Sharad Pawar as my god – Ajit Pawar
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “भाजपसोबत आमची बोलणी सुरू होती, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला नव्हता. मात्र, तरीही लोकांसमोर नेहमी मला विलन केलं जातं. माझी काय चूक आहे. आजही मी माझा दैवत शरद पवारांना मानतो. शरद पवार यांच्या छत्रछायेखालीच मी घडलो आहे.”
पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “शरद पवार यांनी जर आमच्या विरोधात दौरे केले सभा घेतल्या तर मला पण तिकडे जाऊन सभा घ्याव्या लागतील. घरात दुरावा यायला नको म्हणून त्यांनी आता थांबायला हवं. तुमचं वय आता 83 झालं आहे. तुम्ही थांबणार आहात की नाही?”
“आमच्या सरकार चालवायची धमक नाही का? आम्हाला आशीर्वाद का दिला जात नाही? घरात देखील 60 वर्षानंतर 25 वर्षाच्या मुलाला सांगितलं जातं की आता तुला जबाबदारी सांभाळायची आहे. मात्र, आम्हाला जबाबदारी दिली जात नाही. 2017 मध्ये शिवसेना जातीयवादी होता. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आपण शिवसेनेसोबत जायचं आहे. मग शिवसेना जातीयवादी राहिला नाही. त्यावेळी अचानक भाजप जातीयवादी झाला,” असही ते यावेळी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | आम्ही कुणाच्या पोटी जन्माला नाही आलो, ही चूक आहे आमची – अजित पवार
- Praful Patel | शरद पवारांनी आमच्या भावना समजून आम्हाला आशीर्वाद द्यावा – प्रफुल्ल पटेल
- Dhananjay Munde | अजित पवार नेहमी टीकेचे धनी होतात – धनंजय मुंडे
- Ajit Pawar | अजित पवारांच्या बैठकीत शरद पवारांच्या नावाची रिकामी खुर्ची? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Chhagan Bhujbal | शरद पवार आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेतलंय – छगन भुजबळ