Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार असल्याचं देखील बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
The CM of Maharashtra is and will remain Eknath Shinde – Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि तेच राहतील. यामध्ये कोणीही काहीच गैरसमज करून घेऊ नये. शिंदे गटात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण होणार नाही. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुठे किंतु परंतु करण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. आमच्या महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहे.”
दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार एकमेकांमध्ये भिडले (Chandrashekhar Bawankule) आहे. त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नागपूरहून तातडीनं मुंबईला परतावं लागलं. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शिंदे गटात वाद निर्माण झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात (Chandrashekhar Bawankule) बोललं जात आहे. या घटनेवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | …म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नागपूरहून मुंबईला आले
- Nilesh Rane | जास्त हसून बोलणारी लोकं नेहमी खोटारडी असतात; निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका
- Eknath Shinde | CM शिंदे राजीनामा देणार? उदय सामंत म्हणतात…
- Supriya Sule | भाऊ-बहिण आमने-सामने! अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
- Ajit Pawar | मला नेहमी जनतेसमोर विलन ठरवलं जातं – अजित पवार