Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. या चर्चांमुळे शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला धारेवर धरलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “बहुमत 170 चं असताना 40 जणांच्या गटाला सरकारमध्ये सामील केलं जातं. याचा अर्थ असा की तुमची (शिंदे गट) गरज संपली आहे. अजित पवारांच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. मात्र शिंदे गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांचा शपथविधी झाला नाही.”
Chief Minister Eknath Shinde should resign – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, असा दावा मी पुन्हा एकदा करतो. ना घर का, ना घाट का अशी अवस्था शिंदेंची झाली आहे. ही परिस्थिती त्यांनी स्वतःवर ओढवून घेतली आहे. अजित पवारांमुळे पक्ष सोडला असे म्हणणारे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून काय त्यांच्या मांडीवरच येऊन बसले आहे. स्वाभिमान अभिमान असेल तर ते राजीनामा देतील.”
“मणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तरीही केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही. केंद्र सरकार सध्या राजकारणात आणि इतरांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहे. सरकारला निवडणुकांचे बिगुल वाजवायला वेळ आहे मात्र, मणिपूरविषयी एक शब्द बोलायला वेळ नाही”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | शिंदेंचे आमदार ठाकरे गटात परतणार; ठाकरे गटाचा दावा
- Eknath Shinde | अजित पवारांची होणार गोची! 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम
- Chandrashekhar Bawankule | सरकारमधून शिंदे गट बाहेर पडणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं
- Eknath Shinde | …म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नागपूरहून मुंबईला आले
- Nilesh Rane | जास्त हसून बोलणारी लोकं नेहमी खोटारडी असतात; निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका