Uday Samant | ठाकरे गटात कुणीच परत जाणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार असल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर अजित पवार आल्यानं शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना उदय सामंत यांनी पूर्णविराम दिला आहे. याबद्दल उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. Chief Minister Eknath Shinde will not … Read more

Published On: 

Uday Samant | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार असल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर अजित पवार आल्यानं शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना उदय सामंत यांनी पूर्णविराम दिला आहे. याबद्दल उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Chief Minister Eknath Shinde will not resign – Uday Samant

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही. आम्ही राजीनामा देणारे नाही तर राजीनामा घेणारे लोक आहोत. त्याचबरोबर ठाकरे गटात कुणीच परत जाणार नाही. राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज नाही.”

पुढे बोलताना ते (Uday Samant) म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील, असं देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहे. आमचे आमदार कोणाच्याही संपर्कात नाही. लवकरच खाते वाटप केलं जाणार आहे.”

दरम्यान, शिंदे गटाचे 08 ते 10 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही आमदारांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर ज्यांना मंत्रिपद जाण्याची भीती आहे, ते आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. शिंदे गटाला फक्त दोन मंत्री पद मिळणार असल्यामुळे शिंदे गटात (Uday Samant) मोठा वाद झाला आहे.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही