Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार आल्यानं शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. शिंदे गटच नाही तर भाजपचे देखील अनेक आमदार नाराज असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
The MLA would be upset with the loss of the ministerial post – Sanjay Shirsat
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “मंत्रिपद गेल्यावर आमदार नाराज होणारच, ते सहाजिक आहे. भाजपचे 106 आमदार आहे. त्यामध्ये फक्त नऊ आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे भाजपचे अनेक आमदार थोडेफार नाराज आहेत. फक्त भाजप नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली नाही. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर इच्छुकांची देखील धाकधूक वाढत चालली आहे.”
दरम्यान, शिंदे गटात (Sanjay Shirsat) कुणीचं नाराज नसल्याचं उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे. उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाही. आम्ही राजीनामा देणारी नाही तर घेणारी लोक आहोत. शिंदे गटातील कुणीच ठाकरे गटात परत जाणार नाही.”
“राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट (Sanjay Shirsat) नाराज नाही. त्याचबरोबर आमचे आमदार कुणाच्याही संपर्कात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे”, असही ते यावेळी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं शक्य नाही – नितेश राणे
- Uday Samant | ठाकरे गटात कुणीच परत जाणार नाही – उदय सामंत
- Devendra Fadnavis | सिंचन घोटाळ्यातील बैलगाडी भर पुराव्यांचं करायचं काय? नेटकऱ्यांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल
- Sanjay Raut | महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार हे नक्की – संजय राऊत
- Uddhav Thackeray | शिंदेंचे आमदार ठाकरे गटात परतणार; ठाकरे गटाचा दावा