Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “अभिजीत पानसे संजय राऊत यांना भेटले ही खूप मोठी हास्यस्पद गोष्ट आहे. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कड्या लावण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. सगळ्या गोष्टींचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच्या वहिनींच्या हातात आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रस्ताव मनसेनं सामना कार्यालयाच्या ऐवजी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर मांडायला हवा होता.”
Uddhav Thackeray did not manage his family properly in his life – Nitesh Rane
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी आयुष्यात स्वतःचं कुटुंब नीट सांभाळलं नाही. स्वतःच्या सख्ख्या भावाला त्यांनी कधी विचारलं नाही. स्वतःच्या वडिलांच्या विचाराला त्यांनी कधी किंमत दिली नाही. उद्धव ठाकरेंनी त्याच्या सर्व सहकाऱ्यांना लांब केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रस्तावाला भिक सुद्धा घालणार नाही.”
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात (Nitesh Rane) नवीन समीकरणं तयार झाली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant | ठाकरे गटात कुणीच परत जाणार नाही – उदय सामंत
- Devendra Fadnavis | सिंचन घोटाळ्यातील बैलगाडी भर पुराव्यांचं करायचं काय? नेटकऱ्यांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल
- Sanjay Raut | महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार हे नक्की – संजय राऊत
- Uddhav Thackeray | शिंदेंचे आमदार ठाकरे गटात परतणार; ठाकरे गटाचा दावा
- Eknath Shinde | अजित पवारांची होणार गोची! 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम