Supriya Sule | ट्रिपल इंजिन स्वार्थी खोके सरकारमुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मराठा समाजाने केलेल्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहे.

कारण मराठ्यांनी केलेल्या मागणीला ओबीसींनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेते राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहे.

यानंतर दोन्ही समाजात तेढ निर्माण होत असून राज्यातील शांतता भंग होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रिपल इंजिन स्वार्थी खोके सरकारमुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, असं सुप्रिया सुळे  ( Supriya Sule ) यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या, “छगन भुजबळ यांच्याकडे खूप महत्त्वाचं मंत्रिपद आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं कॅबिनेटमध्ये मांडलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्याचबरोबर ट्रिपल इंजिन स्वार्थी खोके सरकारमुळे महाराष्ट्राचं नुकसान जे नुकसान झालं आहे, ते होणार नाही.”

What topics are discussed in the cabinet? – Supriya Sule

पुढे बोलताना त्या  ( Supriya Sule ) म्हणाल्या, “त्यांचे तब्बल 200 आमदार आहे. अशात तुमच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बोलता येत नाही तर संजय राऊत जे कॅबिनेटमध्ये गॅंगवर चाललं आहे ते म्हणतात ते खरं आहे.

कॅबिनेटमध्ये या विषयांवर चर्चा होत नाही तर कोणत्या विषयांवर चर्चा होते? यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे, हे मोठं दुर्दैव आहे. ट्रिपल इंजिन स्वार्थी खोके सरकारमुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे.”

महत्वाच्या बातम्या

Shubman Gill | कर्णधार पदाचा तिढा सुटला; हार्दिकनंतर शुभमन गिल करणार गुजरातचं नेतृत्व

Hardik Pandya | गुजरातच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या गुजरातला सोडून मुंबईत परतला

Chhagan Bhujbal | शिंदे समिती बरखास्त करा, आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही – छगन भुजबळ

Bank Job | SBI मध्ये नोकरीची संधी! 5447 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sanjay Raut | एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका; संजय राऊतांनी भुजबळ-जरांगेंना झाप-झाप झापलं

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.