Eknath Shinde | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई? राज्य सरकारकडून हालचाली सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde  | टीम महाराष्ट्र देशा: ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.

यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला असून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाल्याचा दिसून आला आहे.

अशात शेतकऱ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी सरकारच्या ( Eknath Shinde ) हालचालींनी वेग धरला आहे. नुकसानग्रस्त भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे.

Ajit Pawar called an urgent meeting

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी सरकार ( Eknath Shinde ) हालचाली करताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती मिळवण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. मंगळवारी (28 नोव्हेंबर) ही बैठक होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तर सरकारने  ( Eknath Shinde ) जिल्हाधिकाऱ्यांना येत्या दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करण्याचे आदेश दिले आहे.

त्यानंतर त्यांना याबाबत अहवाल सादर करायचं देखील सरकारने सांगितलं आहे. हे अहवाल केंद्रात पाठवले जाणार आहे.

दरम्यान, राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  ( Eknath Shinde ) यांनी अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

हे पंचनामे तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पंचनामे तयार झाल्यानंतर त्यांना अहवाल सादर करण्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या