IND vs AUS | तिसरा IND vs AUS टी-20 सामना होणार रद्द? जाणून घ्या सविस्तर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकलेले असून या मालिकेमध्ये भारतीय संघाने 2 – 0 आघाडी घेतली आहे.

अशात आज या मालिकेतील ( IND vs AUS ) तिसरा सामना होणार आहे. गुवाहाटी येथे हा सामना खेळला जाणार आहे.

भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav ) नेतृत्वाखाली हा सामना खेळायला उतरणार आहे. तत्पूर्वी हा ( IND vs AUS ) सामना रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

IND vs AUS match will not be cancelled

राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. हिवाळ्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे.  अशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध  ( IND vs AUS ) सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

अशात हवामान खात्याने दिलासादायक माहिती दिली आहे. आज गुवाहाटीमध्ये पाऊस पडणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. यावेळी गुवाहाटीमधील तापमान 21 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हा  ( IND vs AUS ) सामना रद्द होणार नाही. क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध  ( IND vs AUS )  सुरू असलेल्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरला आहे.

सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. टीम इंडियाने मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने आपल्या नावावर केले आहे.

सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल या खेळाडूंनी या सामन्यांमध्ये  ( IND vs AUS ) उत्कृष्ट खेळी खेळली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.