Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी झटत आहे. मराठा नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनादरम्यान राज्यात हिंसाचार घडताना दिसला होता. यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मराठ्यांवर गुन्हे दाखल करणार नाही, असं सरकारने म्हटलं होतं.
मात्र, तरी देखील मराठ्यांवर गुन्हे दाखल होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठ्यांना वेड्यात काढत आहे का? असा सवाल मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी उपस्थित केला आहे.
What is the need to arrest? – Manoj Jarange
प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “सरकारने गुन्हे मागे घेणार, असं म्हटलं होतं. त्यामुळे अटक करायची गरज काय आहे? सरकारने नेमकं काय डाव टाकला आहे?
अटक करणार नाही, गुन्हे मागे घेणार, असं सरकार म्हणत आहे. परंतु, सरकार कार्यकर्त्यांना अटक करत आहे. याबाबत मी ( Manoj Jarange ) अधिकृत माहिती मिळवणार आहे.
राज्य सरकार मराठ्यांना फसवत आहे का? ते मराठ्यांना वेड्यात काढत आहे का? त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही शोध घेणार आहोत. आम्ही उघड्याला उघड पाडणार आहोत.”
दरम्यान, राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, ही माझी शासनाला हात जोडून विनंती आहे. पेरणी करत असताना व्यवस्थित पाऊस झाला नाही. पेरणी झाल्यानंतर देखील पुरेसा पाऊस पडला नाही.
त्यानंतर आता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत करायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | शेतकऱ्यांशी भावनिक नातं नसलेलं सरकार सत्तेत – संजय राऊत
- IND vs AUS | तिसरा IND vs AUS टी-20 सामना होणार रद्द? जाणून घ्या सविस्तर
- Eknath Shinde | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई? राज्य सरकारकडून हालचाली सुरू
- Pneumonia China | कोरोनानंतर चीनमधून येतंय न्यूमोनिया नावाचं संकट; ठाकरे गटाने दिला सतर्क राहण्याचा इशारा
- Row Papaya | कच्च्या पपईचे सेवन केल्याने मिळतात आरोग्याला बहुतांश फायदे