Raj Thackeray | हिंदुत्वाबद्दल शिंदे सरकार फक्त तोंड वाजवतंय – राज ठाकरे

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई शहरातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. 25 नोव्हेंबर 2023 रोजी ही मुदत संपली आहे.

परंतु, यानंतर देखील बहुतांश दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यात आलेल्या नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या मुद्द्यावर भाष्य करत असताना राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी शिंदे सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. हिंदुत्वाबद्दल शिंदे सरकार फक्त तोंड वाजवतंय, असं राज ठाकरे ( Raj Thackeray )  यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले, “आपलं सरकार मराठी आणि हिंदुत्वाबद्दल फक्त तोंड वाजवत आहे.

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, असं ते म्हणत असतात. परंतु, त्यांचे कोणते बाळासाहेबांचे विचार आहे?

सुप्रीम कोर्टाने मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे. तरी देखील राज्य सरकार मराठी पाट्या लावण्यावर सक्ती करत नाही.

पूर्वी मी मशिदीवरील भोंगे काढायला लावले होते. ते देखील या सरकारला जमलं नव्हतं. राज्यामध्ये सरकारचा धाक नावाची गोष्ट आहे की नाही? कोर्टाची भीती वाटते की नाही?”

I have faith in Mumbai Police – Raj Thackeray

दरम्यान, पुण्यामध्ये ड्रग्स रॅकेट सापडलं आहे. यावेळी बोलत असताना राज ठाकरे ( Raj Thackeray )  यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“पुण्यासह देशात सर्वत्र हे पसरत चाललं आहे. माझा मुंबई पोलीसांवर अत्यंत विश्वास आहे. सरकारने मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांना 24 तासांचा वेळ द्यावा.

पोलीस सर्व जागेवर आणतील. परंतु, सगळीकडे ड्रग्सचा पैसा वापरला जात आहे का? अशी शंका सध्या निर्माण झाली आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.