Airtel VS Jio भांडणात लोकांचा फायदा; मोफत Netflix आणि 3GB डेटासह नवीन मोबाइल प्लॅन लॉन्च

Airtel Jio Netflix Basic Subscription Plan | Airtel च्या नवीन Rs 1,499 प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 3GB दैनंदिन डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 SMS प्रतिदिन, हे सर्व 84 दिवसांसाठी वैध आहे तर जिओकडे रु. 1,099 अमर्यादित 5G डेटा, 2GB दैनंदिन डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 84-दिवसांची वैधता आहे.

Published On: 

Bharti Airtel | Airtel ने एक नवीन मोबाइल प्रीपेड प्लॅन ( Prepaid Plan ) सादर केला आहे. त्यावर तुम्हाला नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन ( Netflix Basic Subscription Plan ) आणि अमर्यादित 5G डेटा  मिळणार आहे. हे पॅकेज सध्या एअरटेलकडून प्रीपेड वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले आहे. आता OTT वापरकर्त्यांसाठी नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन आणि वेगवान इंटरनेट या पॅकेज मधून मिळणार आहे.

एअरटेलने ( Airtel ) प्रीपेड प्लॅन रु. 1499 या प्लॅनबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.  टेलिकॉम टॉक वेबसाइटने याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार लवकर हा प्लॅन वापरकर्त्यांना उपलब्द्य होणार आहे.

Airtel Rs 1499 Prepaid Plan ( Netflix Basic Subscription Plan )

Airtel च्या नवीन Rs 1,499 प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 3GB दैनंदिन डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 SMS प्रतिदिन, हे सर्व 84 दिवसांसाठी वैध आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन, अमर्यादित 5G डेटा ऍक्सेस, अपोलो 24|7 सर्कल मेंबरशिप, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक ऍक्सेस यासह अनेक फायदे मिळणार आहे.

भारतातील नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शनची स्टँडअलोन किंमत 199 रुपये आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अतिरिक्त सदस्यता खर्चावर बचत करता येणार आहे.

Airtel चा मोफत Netflix आणि 3GB डेटासह नवीन मोबाइल प्लॅन

तुमच्या मोफत Netflix बेसिक सबस्क्रिप्शन ऍक्सेस करण्यासाठी Airtel Thanks App वापरू शकता. Netflix आणि अमर्यादित 5G डेटा लाभ घेण्यासाठी, अॅपमधील ‘डिस्कव्हर थँक्स बेनिफिट्स’ विभागात नेव्हिगेट करा, जिथे तुम्हाला नेटफ्लिक्स दिसून येईल. तुमच्या मोबाईल नंबरवर नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन सक्रिय करण्यासाठी ‘क्लेम’ बटणावर टॅप करा आणि त्यानंतर ‘प्रोसीड’ बटण दाबा.

विशेष म्हणजे, Netflix बेसिक सबस्क्रिप्शन ( Netflix Basic Subscription Plan validity ) प्रीपेड प्लॅनच्या संपूर्ण 84 दिवसांच्या कालावधीसाठी वैध राहील.

JIO Netflix Subscription Plan

दरम्यान, एअरटेलचा प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओकडे दोन प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यात नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे, जे मोबाइल आणि मोठ्या स्क्रीन पाहण्याच्या दोन्ही गरजा पूर्ण करतात. रु. 1,099 ची योजना मोबाइल वापरकर्त्यांसाठी अमर्यादित 5G डेटा, 2GB दैनंदिन डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 84-दिवसांची वैधता आहे.  तर मोठ्या स्क्रीनवर ( TV Laptop ) पाहण्यासाठी, रु. 1,499 चा प्लॅन आहे. अमर्यादित 5G इंटरनेट ऑफरसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन 84-दिवसांच्या ( Netflix Basic Subscription Plan validity ) वैधतेसह मिळते.

दोन्ही प्लॅन मध्ये बेसिक Netflix सबस्क्रिप्शनचा फायदा आहे. विद्यमान Netflix खाते असलेले वापरकर्ते Netflix सक्रियकरण प्रक्रियेदरम्यान त्यांना लिंक करू शकतात. खाते लिंक होईपर्यंत, वापरकर्त्यांना त्यांच्या Netflix सदस्यतेसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाईल. हा प्लॅन मोबाइल डिव्हाइसेस, Jio सेट-टॉप बॉक्स, टॅबलेट आणि लॅपटॉपसारख्या मोठ्या स्क्रीनवर पाहता येईल.

महत्वाच्या बातम्या

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही