Share

पोर्शे कार अपघात प्रकरण सुनिल टिंगरेंना भोवणार? 

Sunil Tingre porsche accident high court

Sunil Tingre | Porsche Accident | High Court | पोर्शे कार अपघात प्रकरण सुनिल टिंगरेंना ऐन निवडणुकीच्या काळात भोवणार असल्याचे चित्र आहे. तसे झाल्यास सुनील टिंगरे यांच्याविरोधात जनमत जाण्याची शक्यता आहे.

१९ मे रोजी विशाल अग्रवाल याच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कारने अनिश आणि अश्विनी यांना उडवले, त्यात अनिश आणि अश्विनी यांचा मृत्यू झाला. मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात झाला होता. त्यानंतर आमदार सुनील टिंगरेंनी ( Sunil Tingre ) अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

दरम्यान, अनिश अवधिया याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. टिंगरे यांचा अपघात प्रकरणात ( Porsche Accident ) सहभाग नेमका कशासाठी होता, ते पहाटे ४ वाजता येरवडा पोलिस ठाण्यात कशासाठी गेले, त्यांनी नेमके पोलिस ठाण्यात काय केले, तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी तसेच दोषारोपपत्रात टिंगरे यांचे नाव का नाही, याचे उत्तर मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे ओमप्रकाश अवधिया यांनी सांगितले.

आमदार सुनील टिंगरे यांनी आमची कोणतीही मदत न करता, आरोपीच्या बचावासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली असल्याचे ओमप्रकाश अवधिया यांनी नमूद केले आहे.

पुढे बोलताना अवधिया म्हणाले, ”आम्ही पुणे शहरात दिवसाढवळ्या होणारे फायरिंग, कोयता गँग या बातम्या बघत असतो, त्यामुळे आमच्या जिवाला शहरात आल्यावर काही धोका तर होणार नाही ना? असा प्रश्न पडतो. त्यांच्या पक्षाने ( अजित पवार गट ) याअपघात प्रकरणानंतर त्यांना पुन्हा तिकीट देणे योग्य नाही असेही ते म्हणाले.

Sunil Tingre Porsche Accident High Court

महत्वाच्या बातम्या

Sunil Tingre | Porsche Accident | High Court | पोर्शे कार अपघात प्रकरण सुनिल टिंगरेंना ऐन निवडणुकीच्या काळात भोवणार असल्याचे चित्र …

पुढे वाचा

Pune India Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now