Eknath Shinde | शेतकऱ्यांना लवकर मिळणार दिलासा? राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुंबई: मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण अत्यंत तापलेलं आहे. तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची ( Eknath Shinde )  महत्त्वाची बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये  ( Eknath Shinde ) मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून मदत मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील 99 हजार हेक्टर वरील फळबागांना मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर ऊस, कापूस, कांदा, इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Possibility of announcing aid to farmers in the winter session

आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  ( Eknath Shinde ) सर्व पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. येत्या आठवड्यात राज्य सरकार नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये पंचनामे करणार आहे.

त्यानंतर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी केंद्रात देखील प्रस्ताव मांडला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये  ( Eknath Shinde ) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसन सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतरित करताना आकारण्याच्या हस्तांतर शुल्कात कपात करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  ( Eknath Shinde ) यांनी शेतीचे नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना हे पंचनामे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. पंचनामे तयार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे देखील मुख्यमंत्री शिंदेंनी ( Eknath Shinde ) सांगितलं आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या