SIM Card Rules – १ डिसेंबरपासून सिमकार्डचे नवे नियम

SIM Card Rules । दूरसंचार विभाग ( Department of Telecommunications ) 1 डिसेंबर 2023 पासून नवीन सिम कार्ड नियमांची अंमलबजावणी करणार आहे. सरकारने सुरुवातीला हे नियम चालू वर्षाच्या ऑगस्टमध्ये जाहीर केले असले तरी, अंमलबजावणी 1 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.

भारतात ऑनलाइन आर्थिक फसवणूक गुन्हेंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरासरी तासाला १००० गुन्हेंची नोंद होत आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूकचे प्रमाण वाढत असल्याने सरकारने १ डिसेंबरपासून सिमकार्डचे नवे नियम लागू करणार आहे.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर, एकट्या एप्रिल 2023 मध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या 700,000 तक्रारी होत्या, त्यापैकी जवळपास 100,000 तक्रारी फक्त उत्तर प्रदेशमधील होत्या. म्हणजे दिवसाला 23,000 गुन्हे आणि तासाला 1,000 गुन्हे.

जानेवारी २०२० ते जून २०२३ या कालावधीत सायबर गुन्ह्यांपैकी ७७.४ टक्के ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे फ्यूचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (FCRF) या आयआयटी कानपूर नानफा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातुन समोर आले आहे.

ऑनलाइन आर्थिक फसवणूकीला आळा बसवा म्हणून सरकारे १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू करणार आहे. नवीन नियमांनुसार, सरकारने ( Department of Telecommunications ) सिम कार्ड डीलर्सची पडताळणी अनिवार्य केली आहे आणि बल्क कनेक्शनची तरतूद रद्द केली आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक कमी करणे हा या मागील उद्देश आहे

शिवाय, टेलिकॉम ऑपरेटरना आता फ्रँचायझी, पॉइंट-ऑफ-सेल (PoS) एजंट आणि वितरकांची नोंदणी करणे आवश्यक आहे.  यामुळे असामाजिक किंवा देशद्रोही काम करणाऱ्या लोकांना दूर ठेवेल. फसव्या पद्धतींने सिम कार्ड जारी करणाऱ्या PoS एजंटनांही यामुळे आळा बसणार आहे.

नवीन सुधारित नियमांनुसार, PoS एजंटांनी परवानाधारकांसोबत लेखी कराराद्वारे स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की बेकायदेशीर कृत्य केले आणि नियम न पाळल्यास तीन वर्षां साठी काळ्या यादीत PoS एजंट चा समावेश करण्यात येईल.

नवीन सिम कार्ड घेताना आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे घटना समोर आल्या आहेत. त्या रोखण्यासाठी आधारवरील QR कोड स्कॅन करणे अनिवार्यपणे आहे. मोबाईल नंबर डिस्कनेक्ट झाल्यास, तो 90 दिवसांच्या कालावधीसाठी नवीन ग्राहकाला परत दिला जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.