Chhagan Bhujbal | छगन भुजबळांची मराठा आंदोलकांना हुलकावणी; येवला दौऱ्यासाठी निवडला वेगळाच मार्ग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | नाशिक: राज्यामध्ये एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येवल्यामध्ये दाखल होणार होते.

त्यांच्या  ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध दर्शवला होता. यासाठी मराठा समाज विंचूर चौफुली येथे जमला होता.

परंतु, मंत्री छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आंदोलकांना हुलकावणी दिली आहे. भुजबळ यांनी या दौऱ्यासाठी वेगळाच मार्ग निवडला आहे.

Farmers suffered huge losses due to irregular rains

राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ यांनी दौरा सुरू केला आहे.

त्यांच्या ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्यासाठी मराठा आंदोलकांनी रस्ता रोको तयारी केली होती. येवला विंचूर चौफुलीवर मराठा समाजाने हा बंदोबस्त केला होता.

ही माहिती छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यापर्यंत पोहोचताचं भुजबळ यांनी आपला मार्ग बदलला. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मराठा-ओबीसी वाद टाळण्यासाठी छगन भुजबळ अंगणगाव मार्गे आपल्या पाहणी दौऱ्यावर निघून गेले.

छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी आपला मार्ग बदलल्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये होणारा वाद टाळला आहे.

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. यासाठी मराठा समाजाने राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होताना दिसत आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

त्यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. अशात राज्य सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या