Bacchu Kadu | छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं ओबीसींचं भलं करायचं असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मांडली आहे.

यानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वादविवाद होताना दिसत आहे. अशात या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं ओबीसींचं भलं करायचं असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी म्हटलं आहे.

About 33 lakh records of Marathas have been found – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, “छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं ओबीसींचं भलं करायचं असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, मराठ्यांना वेगळं ठेवून भलं होणार नाही.

त्यांना मराठ्यांना ठेवावं लागणार आहे. मराठ्यांच्या जवळपास 33 लाख नोंदी सापडल्या आहे. यानंतर साधारण 10-15 लाख नोंदी राहिल्या असतील.

5 कोटी मराठे ओबीसीत सामील होणार, असा बोभाटा यांनी केला आहे. विदर्भातील बच्चू कडू ( Bacchu Kadu ) गेल्या 50 वर्षापासून ओबीसीत सामील झाला आहे.

विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकणातला मराठा 50 वर्षे अगोदर ओबीसीत सामील झाला आहे. अशात ते कोणासाठी बोंबलत आहे.”

दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे.

त्यामुळं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आज नाशिकच्या येवल्यात दाखल होणार आहे.

त्यांच्या या दौऱ्याला सकल मराठा समाजाने विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या ताफ्याला मराठा समाज काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.