Chhagan Bhujbal | मराठा समाज आक्रमक; भुजबळांच्या येवला दौऱ्याला केला विरोध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | नाशिक: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद होताना दिसला आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते.

अशातच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आज नाशिकच्या येवला दौऱ्यावर आहे.

भुजबळांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने ( Chhagan Bhujbal ) कडकडून विरोध केला आहे. यानंतर मराठा आणि ओबीसी वाद आणखीन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Chhagan Bhujbal will enter Yewla today

गेल्या दोन दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसासह अनेक भागात गारपीटीने हजेरी लावली आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आज नाशिकच्या येवल्यात दाखल होणार आहे.

त्यांच्या ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्याला सकल मराठा समाजाने कडकडून विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जाणार आहे.

त्याचबरोबर रस्त्यावर बसून मराठा समाज भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. अशात छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) त्यांचा हा दौरा पूर्ण करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) राज्यामध्ये जागोजागी एल्गार मेळावे घेताना दिसले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या राज्यात सभा होत आहे.

या सभेदरम्यान दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले. या सर्व घटनानंतर राज्य सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या