Manoj Jarange | 24 तारखेला दगा-फटका झाला तर काय होईल? मनोज जरांगे म्हणतात…

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली होती.

यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं होतं. उपोषण मागे घेताचं सरकारने या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे ( Manoj Jarange ) यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

मात्र, जरांगेंनी ( Manoj Jarange )  राज्य सरकारला ही मुदत देण्यास नकार दिला. त्यानंतर जरांगे यांनी सरकारला या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.  24 तारखेला दगा-फटका झाला तर काय होईल? यावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

December 24 is the last deadline given to the government – Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “01 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत माझा दौरा असणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमध्ये हा दौरा असणार आहे.

उद्या जालन्यामध्ये मोठी सभा होणार आहे. मराठा समाजाने आंदोलन केल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत आहे. 24 डिसेंबर ही सरकारला शेवटची डेडलाईन दिलेली आहे.

24 तारखेला दगा-फटका झाला तर काय होईल? हे आम्ही नंतर सांगू. मात्र, आमच्यासोबत दगा फटका होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण देणार.

कारण ते मराठा समाजाची नाराजी पत्कारू करू शकत नाही. त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना पाठिंबा देतील. त्यांनी जर 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठ्यांचा रोष त्यांना परवडणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.