Chhagan Bhujbal | छगन भुजबळांच्या जीवाला धोका? मिळाले सलग 12 धमकीचे मेसेज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण अत्यंत तापलेलं आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर दोन्ही समाज आमने-सामने आले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले.

या घडामोडी घडत असताना मंत्र छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )  यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal )  यांना सलग 12 धमकीचे मेसेज आले आहे.

Chagan Bhujbal has received 12 consecutive threatening messages

मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. यानंतर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर टीकाटिपणी करताना दिसले.

अशात छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांना सलग 12 धमकीचे मेसेज आले आहे. सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तीच्या फोनवरून ही धमकी आली असल्याच्या चर्चा सुरू आहे.

या माहितीनंतर भुजबळांच्या  ( Chhagan Bhujbal ) चिंतेत वाढ झालेली असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं देखील बोललं जात आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) आणि मनोज जरांगे यांच्यात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) राज्यामध्ये जागोजागी एल्गार मेळावे घेत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या जाहीर सभा पार पडत आहे. या सभांमध्ये बोलत असताना दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले. या सर्व घटनानंतर राज्य सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का? याबाबत आता राज्यात चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या