Sanjay Raut | 2024 ला भारताला भाजपपासून मुक्तता मिळणार – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांचं सत्र सुरू आहे. या निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील जोरदार प्रचार करत आहे.

या पाच राज्यातील निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आला आहे. यामध्ये चार राज्यामध्ये काँग्रेस आघाडीवर असलेली दिसली आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे. 2024 ला भारताला भाजपपासून मुक्तता मिळणार आहे, असं संजय राऊत  ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

We will see transformation in five states – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत  ( Sanjay Raut ) म्हणाले, “राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम हे पाच राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष निकालावर आपण बोललेलं बरं असतं. या पाच राज्यात आपल्याला परिवर्तन झालेलं दिसणार आहे.

या सर्व राज्यांमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने एक वादळ निर्माण केलं आहे. ही 2024 च्या परिवर्तनाची झलक आहे.”

पुढे बोलताना ते ( Sanjay Raut )  म्हणाले, “2014 पासून त्यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. काँग्रेस मुक्त भारताची घोषणा करणाऱ्यांना राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी घाम फोडला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आठ-आठ दिवस एका राज्यात प्रचारासाठी राहावं लागत आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांना देश वाऱ्यावर सोडून निवडणुकांचा प्रचार करावा लागत आहे.

हे तुमचं काँग्रेसमुक्त भारतच लक्षण नाही. 2024 ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे आणि त्याचीच ही हवा आहे. राजस्थानसह चारही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, अशी मला  ( Sanjay Raut ) खात्री आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.