Rohit Sharma | रोहित शर्मा मोठ्या मनाने हार्दिक पांड्याला MI चं कर्णधार पद देणार? आर अश्विन म्हणतो…

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League )  2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या येत्या हंगामासाठी सर्व संघ सुसज्ज होत आहे.

त्याचबरोबर आयपीएल 2024 मध्ये आपल्याला अनेक संघात बदल झालेले दिसणार आहे. सर्वात मोठा बदल गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )  आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) मध्ये झालेला दिसून येणार आहे.

कारण गुजरातचा खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. हार्दिक पांड्या मुंबईमध्ये सामील होताच तो संघाचा कर्णधार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. याच चर्चांवर आर अश्विन ( R Ashwin ) याने प्रतिक्रिया दिली आहे.

आर अश्विन म्हणाला, “रोहित शर्मा ( Rohit Sharma ) अत्यंत मोठ्या मनाचा माणूस आहे. त्याचबरोबर तो ( Rohit Sharma ) एक अत्यंत चांगला लीडर आहे.

मुंबई इंडियन्सने संघाचं नेतृत्व जर हार्दिक पांड्याकडे सोपवलं तर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) ही परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो.”

Jasprit Bumrah is upset?

दरम्यान, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर संघातील स्फोटक गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.

कारण रोहित शर्मानंतर ( Rohit Sharma ) बुमराह मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल, अशा चर्चा सुरू होत्या. परंतु हार्दिक पांड्या संघात सामील झाल्यानंतर तो संघाचा पुढचा कर्णधार होईल, असं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराह नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.