Chhagan Bhujbal | मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही, हे मी आधीच सांगितलेलं – छगन भुजबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | कर्जत: राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद होताना दिसत आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसींनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मराठा नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले आहे.

अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची ओळख मराठा विरोधी नेता म्हणून होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही, हे मी आधीच सांगितलेलं आहे, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

Do not give reservation from OBC – Chhagan Bhujbal

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, हे मी आधीपासूनच सांगितलं आहे.

फक्त त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, असं मी ( Chhagan Bhujbal ) म्हटलं आहे. कारण ओबीसींना आधीच आरक्षण कमी आहे.

मराठा आरक्षणाचं बिल पुन्हा मांडण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामधील त्रुटी भरून काढण्यासाठी लोक काम करत आहे. यामध्ये लवकरच यश मिळेल, असं मला वाटतं आहे.”

राज्यामध्ये जातीय दंगल होणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )  यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “त्याबद्दल मला काही कल्पना नाही. प्रकाश आंबेडकर यांना याबद्दल काही माहिती असेल, तर त्यांनी ताबडतोब सरकारला कळवलं पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या