Jitendra Awhad | बाप बनायला अक्कल लागते; जितेंद्र आव्हाडांनी घेतला अजित पवारांचा समाचार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये आयोजित करण्यात आला होता. आज या मेळाव्यामध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) गटावर टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाप बनायला अक्कल लागते, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar formed the Nationalist Congress Party – Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) म्हणाले, “1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी त्यांच्या सभेमध्ये शरद पवारांचा फोटो वापरला आहे.

कालपर्यंत ते शरद पवारांना त्यांचं दैवत म्हणत होते. मात्र, ते आज शरद पवारांवर गोळ्या झाडत आहे. त्यांनी शरद पवारांना संपवण्याची सुपारी घेतली आहे.

शरद पवार काय आहे? हे त्यांना माहित आहे. शरद पवार यांच्या सभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. यांनी जर शरद पवारांचं नाव घेतलं नाही तर त्यांचं भाषण कोणी ऐकणार नाही.

त्यांनी जर शरद पवारांवर टीका केली नाही, तर त्यांची भाषण कोणी बघणार नाही. शरद पवारांच्या नावाला स्पर्श केल्याशिवाय आपली राजकीय उन्नती होणार नाही, हे त्यांना माहित आहे.

पुढे बोलताना ते ( Jitendra Awhad ) म्हणाले, “स्वतःच्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसणारे आमच्यावर टीका करत आहे. यांना फक्त सत्ता पाहिजे बाकी सगळं गेलं खड्ड्यात.

बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नाही आणि बाप बनायला अक्कल लागते.

तुम्हाला शरद पवारांच्या गोष्टी बाहेर काढायच्या असेल तर खुशाल काढा. अशी आव्हानात्मक भाषा आमच्यासमोर बोलू नका. शरद पवारांनी अनेक आव्हानं बघितलेली आहे.”

महत्वाच्या बातम्या