Raj Thackeray | मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक; पुण्यामध्ये फोडल्या इंग्रजी पाट्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | पुणे: सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे. यासाठी कोर्टाने दोन महिन्यांची मुदत देखील दिली होती.

25 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही मुदत होती. मात्र, तरी देखील अनेक दुकान आणि आस्थापनावर मराठी भाषेत पाट्या दिसत नाही.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक ( Raj Thackeray ) झाली आहे. या मुद्द्यावरून मनसेने  ( Raj Thackeray ) पुण्यामध्ये तीव्र आंदोलन केलं आहे. मनसेने  ( Raj Thackeray ) पुण्यामध्ये दुकानांवरील इंग्रजी पाट्या फोडल्या आहे.

Many shops in Pune do not have Marathi boards

पुणे शहरातील अनेक दुकानांवर अद्याप मराठी भाषेत पाट्या लावण्यात आलेल्या नाही. याच पार्श्वभूमीवर मनसेने  ( Raj Thackeray ) पुण्यात आंदोलन केलं आहे.

शहरातील जंगली महाराज रस्त्यावर मनसेने  ( Raj Thackeray ) हे तीव्र आंदोलन केलं. यावेळी मनसे  ( Raj Thackeray ) कार्यकर्त्यांनी दुकानावर असलेल्या इंग्रजी पाट्या फोडल्या आहेत.

तर मराठी पाट्या लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाही तर मोठं  आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनावर मराठी पाट्या नसल्या तर कायदेशीर कारवाई करावी, असं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  ( Raj Thackeray ) महानगरपालिकेला दिलं आहे.

दरम्यान, पुण्यासह नाशिकमध्ये देखील मनसे  ( Raj Thackeray ) आक्रमक झाली आहे. काल (30 नोव्हेंबर) मनसे कार्यकर्त्यांनी नाशिक शहरातील दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळ फासत जोरदार घोषणाबाजी केली. मराठी पाट्या लावा नाहीतर तोंडाला काळ फासू, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी  ( Raj Thackeray ) दिल्या.

महत्वाच्या बातम्या