Sujay Vikhe – कोण-कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहितीये; सुजय विखेंचा रोख निलेश लंकेकडे ?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sujay Vikhe – आगामी लोकसभेसाच्या निवडणुकीसाठी सर्वच नेते तयारीला लागल्याचे चित्र राज्यात आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसतात तर काही ठिकाणी वैयक्तिक आरोप होतानाही दिसत आहेत.

नगर तालुक्यातील पोखर्डी आणि कापूरवाडी येथील विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe ) यांच्या हस्ते झाले. नगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले प्रमुख म्हणून उपस्थित होते.

दिवाळीच्या फराळावरून काही दिवसापूर्वी खासदार विखेंनी आमदार नीलेश लंके यांच्याबरोबर ठाकरे गटाचे विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यावर टीका केली होती.  नुसते दिवाळी फराळाचे वाटप करून, माणूस मोठा होत असता, तर प्रत्येक आमदार हलवाई झाला असता, अशी टीका खासदार विखेंनी आमदार लंकेचे ( nilesh lanke ) नाव न घेता केली होती.

आता पुन्हा एकदा सुजय विखेंनी ( Sujay Vikhe ) आमदार निलेश लंके सहित विरोधकांना धारेवर धरल्याचे चित्र आहे.

यावेळी विखेंनी विरोधकांचा समाचार घेत म्हणाले, “मी केलेली विकासकामे जनतेच्या दरबारात आहेत. ती पुन्हा एकदा जनतेत जावून मांडणार आहे. त्यामुळे पुढचा खासदार कोण, हे जनताच ठरवेल. हे कोणी चार-पाच पुढारी ठरवू शकत नाही”, असे खासदार डॉ. सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी म्हटले आहे.

कोण-कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहित

तसेच, कोणत्या बॅंकेत कोणाचे खाते. रात्री-अपरात्री कोण कुठे जातो. कोण-कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहित आहे. व्हिडिओ सह सर्व गोपनीय अहवाल मी बनवला आहे. हा अहवाल मी शिवाजी कर्डिले यांच्याकडे देणार आहे. त्यांनी ठरवावे कधी कोणता व्हिडिओ रिलीज करायचा. असे म्हणत खासदार सुजय विखेंनी निलेश लंके ( nilesh lanke ) आणि विरोधकांना इशारा दिला.

एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारस असते, त्या दिवशी हे शंभर बोकडे कापतात – नीलेश लंके

दिवाळीच्या फराळावरून झालेल्या टीकेला आमदार नीलेश लंके यांनीही उत्तर दिले होते. ते म्हणाले होते कि, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. दिवाळी सणच गोडधोडाचा कार्यक्रम असतो. दिवाळीनिमित्त शेजारी फराळाचे ताट देण्याची आपली संस्कृती आहे.

मी देखील एक लोकप्रतिनिधी आहे. माझ्या सुख-दुःखात माझ्या मतदारसंघातीलच जनता आहे. त्यांच्याबरोबरच दिवाळीचे गोडधोड खाणार, वाटणारच!

यांना ( Sujay Vikhe ) काय जाते आमदारांना हलवाई म्हणायला. यांनी दिवाळीच्या नावाखाली काय केले हे नगरच्या जनतेला माहीत आहे.” महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारस असते. त्या दिवशी जर हे शंभर बोकडे कापत असतील तर! म्हणजे बळीच घेतला यांनी! ही कोणती पद्धत आहे.

संतांच्या भूमीला हे मान्य नाही. धर्मसंस्कार सांगताना एका बाजूने ‘जय श्रीराम’चा नारा द्यायचा, अन् दुसऱ्या बाजूला धर्माची शिकवण द्यायची. असे कृत्य म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक आहे, असेही आमदार लंके म्हणाले.

आता पुन्हा एकदा सुजय विखेंनी ( Sujay Vikhe ) आमदार निलेश लंके सहित विरोधकांना धारेवर धरल्याचे चित्र आहे. यावर निलेश लंके ( nilesh lanke ) आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येणार हे बघावे लागेल.

नगरमधील अनेकांना खासदारकीचे स्वप्न पडू लागले 

कार्यक्रमात शिवाजी कर्डीले यांनीही विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले,  नगरमधील अनेकांना खासदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना लढू द्या. परंतु सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनाच पुन्हा एकदा खासदार म्हणून आपण निवडून देणार आहोत.

गेली चार वर्षे आपले लोकप्रतिनिधी फक्त नारळच फोडतात. मात्र खासदार विखेंनी या गावांच्या विकासाचा अनुशेष भरून काढला आहे, असेही शिवाजी कर्डिले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या