Manoj Jarange | कार्तिकी एकादशीची पूजा मनोज जरांगेंनी करावी; मराठा समाजाची मागणी

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशात 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे.

कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. परंतु, मराठा समाजाने ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला.

कार्तिकी एकादशीच्या पूजेला उपमुख्यमंत्र्यांना न बोलावण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यानंतर मराठा समाजाने एक मागणी केली आहे. कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी करावी, असं मराठा समाजाने म्हटलं आहे.

उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने एक मागणी केली आहे.

कार्तिकी एकादशी पूजेचा मान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मिळावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दरवर्षी उपमुख्यमंत्री करतात. मात्र, यंदा ही पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, अशी भूमिका मराठा समाजाने मांडली आहे. यानंतर खरंच कार्तिकी एकादशीची पूजा मनोज जरांगे (Manoj Jarange) करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange will be touring across Maharashtra from November 15

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोन जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं (Manoj Jarange) उपोषण स्थगित केलं.

त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी मनोज जरांगे 15 नोव्हेंबर पासून संपूर्ण राज्यभरात दौरे करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.