Sharad Pawar | दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात जाणार? वळसे पाटील-पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) देखील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.

त्यांच्या या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे ही भेट दिवाळीनिमित्त असल्याचं देखील बोललं जात आहे.

Dilip Valse Patil met Sharad Pawar

काल राष्ट्रवादी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील मोतीबागेतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीपूर्वी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जात होते. अशात त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

यानंतर दिलीप वळसे पाटील अजित पवारांना सोडून शरद पवार (Sharad Pawar) गटात सामील होणार असल्याचं राज्याच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट दोघांनीही पक्षावर दावा करत कायदेशीर लढाई सुरू केली आहे.

काल केंद्रीय निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी झाली. तब्बल दीड तास ही सुनावणी सुरू होती. ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद केला. तर अजित पवार गटावर आरोप करत त्यांनी मृत व्यक्तींच्या नावेही प्रतिज्ञापत्रे  सादर केल्याचा दावा त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.