Rishabh Pant | लवकरच होणार रिषभ पंतचे पुनरागमन; सौरभ गांगुलीने दिली महत्त्वाची माहिती

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि स्टार फलंदाज रिषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वापासून दूर आहे. गेल्यावर्षी तो कार अपघातात जखमी झाला होता.

त्यानंतर तो क्रिकेट मैदानापासून दूर आहे. अशात तो तंदुरुस्त झाला असून पुनरागमनासाठी सुसज्ज झाला असल्याची माहिती मिळाली आहे. माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी रिषभ पंतच्या (Rishabh Pant) पुनरागमनाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Rishabh Pant’s car met with an accident last year

गेल्या वर्षी रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल पासून आणि आयपीएल 2023 पासून दूर राहावे लागले होते.

यानंतर तो दुखापतीतून सावरताना दिसत आहे. अशात रिषभ पंत (Rishabh Pant) पुढच्या आयपीएल हंगामामध्ये खेळणार असल्याचं सौरभ गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्समध्ये तो कर्णधार म्हणूनच पुनरागमन करणार असल्याचं गांगुली यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

तर पुढच्या वर्षी जानेवारीत अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या माध्यमातून तो टीम इंडियात पुनरागमन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, 30 डिसेंबर 2022 रोजी रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा भीषण अपघात झाला होता. दिल्लीहून कारने आपल्या घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली होती.

दिल्ली-देहराडून हायवेवर त्याची कार उलटली झाली होती. या अपघातानंतर त्याची (Rishabh Pant) शस्त्रक्रिया झाली होती. आता तो हळूहळू या दुखापतीतून सावरताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe