Vijay Wadettiwar | मनोज जरांगे मराठ्यांच्या मुलांसाठी नाही तर राजकारणासाठी आग्रही; वडेट्टीवारांच्या विधानानंतर मराठा आंदोलन चिघळणार?

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. यासाठी त्यांनी जालना जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मनोज जरांगे मराठ्यांच्या मुलांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहे, असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

Vijay Wadettiwar commented on Manoj Jarange

आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “राज्यातील सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं मोठं नुकसान होऊ शकतं.

त्यामुळे मराठा तरुणांनी जरांगे यांच्या म्हणण्यानुसार वागू नये. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करायला हवा. ईडब्लूएस आरक्षणात फार जाती नाहीत. मराठा समाजाला दहा टक्के ईडब्लूएस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो अत्यंत मोठा फायदा आहे.

मात्र, मनोज जरांगे यांना ईडब्ल्यूस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा हवा असावा. त्यामुळे ते मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाही, मनोज जरांगे राजकीय फायद्यासाठी आग्रही आहे.”

दरम्यान, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मराठा समाजाच्या मागणीला ओबीसी नेत्यांसह (Vijay Wadettiwar) ओबीसी समाजाला विरोध दर्शवला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी हे विधान केलं असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यांच्या या विधानानंतर मराठा आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe