Share

Govt Job Opportunity | SBI मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत अधीसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत अधीसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये उपव्यवस्थापक (सुरक्षा) आणि व्यवस्थापक (सुरक्षा) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करत असताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही. या पदांसाठी (Govt Job Opportunity) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्ष असावे.

बँकेच्या भरती प्रक्रियेसाठी (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1NOv151Zcp1ubk9lFATxQh1k_HF1wVUbt/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://sbi.co.in/

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-26/apply

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही